जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज २६ जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झालं. २३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघांतल्या एकूण ३ हजार ५०२ मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. जम्मू प्रांतात रिआसी, राजौरी आणि पूँछ तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगर, बडगाव आणि गंदेरबाल या सहा जिल्ह्यांमधे झालेल्या मतदानासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. या टप्प्यात सुमारे २५ लाख ७८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Site Admin | September 25, 2024 8:04 PM