जम्मू – काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यु झाला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल, त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल, आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं हे विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची शिफारस नायब राज्यपालांना केली होती.
Site Admin | April 27, 2025 1:29 PM | Assembly Session | Jammu and Kashmir | Pahalgam Terror Attack
जम्मू-काश्मिर विधानसभेचं सोमवारी विशेष अधिवेशन
