जम्मू काश्मीरमध्ये येत्या मंगळवारी मतमोजणी होणार असून मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृह अशा अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीचं मतदान तीन टप्प्यांत मतदान झालं असून तिन्ही टप्प्यांमध्ये एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतकं मतदान झालं आहे.
Site Admin | October 6, 2024 1:52 PM | Jammu and Kashmir assembly elections