जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं.
हरियाणामध्ये येत्या शनिवारी एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे. हरियाणात पलवल इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल सोनीपत इथं सभा घेतली.
हरियाणा तसंच जम्मूकाश्मीर मधे मतमोजणी येत्या ८ ऑक्टोबरला होणार आहे.