जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. कृष्णा घाटी सेक्टरमध्येही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून या भागात भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. गेल्या आठवडाभरात सीमेपलीकडून वाढत असलेल्या कारवायांमुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं.
Site Admin | February 13, 2025 1:11 PM | Jammu and Kashmir
जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात दोन जवान शहीद
