जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या कटरा-बडगाम विभागाची अंतिम चाचणी काल पूर्ण झाली. कटरा रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजता 18 डब्यांची चाचणी रेल्वेगाडी काश्मीरसाठी रवाना झाली. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला हा रेल्वे जोडमार्ग 41 हजार कोटी रुपये पूर्ण करण्यात आला. 326 किलोमीटर लांबीच्या कटरा ते बडगाम मार्गापैकी 111 किलोमीटरचा मार्ग बोगद्यांमधून जातो. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पूल रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधला आहे. एक हजार तीनशे 15 मीटर लांबीचा हा पूल नदीपात्रापासून तीनशे 59 मीटर उंचीवर बांधला आहे. सांगलदान रेल्वे स्टेशन आणि रियासी रेल्वे स्टेशन दरम्यान हा पूल बांधला आहे. भारतीय रेल्वेने अंजिखर नदीवर पहिला केबल-स्टेड पूल देखील बांधला आहे. या प्रकल्पामुळे फलोत्पादन, शेती, पर्यटन, व्यापार आणि शिक्षणाला चालना मिळेल. काश्मीर आणि उर्वरित भारतामधील प्रवास सामान्य लोकांसाठी सोपा आणि स्वस्त होईल.
Site Admin | January 20, 2025 9:52 AM | Jammu and Kashmir