जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या बंधल गावात गेल्या महिन्यात झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार आहे. यासाठी ११ जणांची विशेष तपास समिती नेमण्यात आली आहे. राजौरीच्या पोलिस महासंचालकांनी ही घोषणा केली आहे. मृतांच्या अवशेषामध्ये न्युरोटोक्सिक घटक आढळले असून त्याची सखोल तपासणी करून मृत्यूची कारणं शोधली जाणार आहेत. या तपासपथकात न्यायवैद्यक, टोक्सिकोलॉजी, बालरोग तज्ञ आणि सुक्ष्मजीव शास्त्र तसचं रोग निदान तज्ञांचा समावेश आहे. बंधल गावात गेल्या महिन्यात अज्ञात आजारामुळे केवळ एका महिन्यातच १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ३ कुटुंबातल्या ११ बालकांचा समावेश होता.
Site Admin | January 16, 2025 8:40 PM | Jammu and Kashmir