जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य असून कुलगाम जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले रहिवासी होते. यात भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Site Admin | December 19, 2024 8:37 PM
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार
