जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुलगाम जिल्ह्यातल्या कादर या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. या दरम्यान ही चकमक सुरू झाली होती, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे देखील या बैठकीत सहभागी होतील.