राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणारं आहे, त्यामुळेच एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्क्यानं घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी सांगितलं.
या क्षेत्रातल्या दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं ते म्हणाले. यावेळी शहा यांनी देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी बलिदान देणाऱ्या राज्य पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचेही आभार मानले.केंद्र सरकारनं ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ अंतर्गत येत असलेल्या ३० पेक्षा जास्त देशांसोबत धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित तसंच बळकट केली असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गरिटा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तराच्या माध्यमातून सांगितलं.