जमैकाचे प्रधानमंत्री अँड्रयू होलनेस यांचं आज नवी दिल्ली इथं आगमन झालं. ते चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. भारताला भेट देणारे ते पहिलेच जमैकन प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते उद्या शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चा करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची ही ते भेट घेतील. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील हस्तींनाही ते भेटतील. या भेटीत भारत जमैका द्विपक्षीय संबध दृढ करणारे अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
Site Admin | September 30, 2024 1:26 PM