जालनातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर आज सकाळी प्रवासी वाहतूक करणारी एक बस वीस फुट खड्डयात कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखली आगाराची ही बस कोळेगाव घाट चढत असताना अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानंतर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
Site Admin | December 24, 2024 6:57 PM | Bus Accident | Jalna