डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 22, 2024 7:17 PM

printer

जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात आज वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर पांगरी शिवारात आज पहाटे भरधाव पीकअप समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. पीकअप वाहन नाशिकहून फळफ्रुट घेऊन अमरावतीकडे जात होते, असं पोलीसांनी सांगितलं. 

दरम्यान, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात आज सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  गंभीर जखमी व्यक्तीला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आन्वाकडून भोकरदनकडे भरधाव जात असलेल्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गेली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा