पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती वर्षानिमित्त जळगाव इथं आज विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत, तसंच दृक-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आले. तृतीय जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणाऱ्या तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान करणाऱ्या शाहिरी पोवाड्यांचंही यावेळी सादरीकरण झालं.
Site Admin | March 24, 2025 6:52 PM | Jalgaon
जळगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
