जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून पंधरा दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. नीती आयोगातर्फे या उपक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्यानं ही मोहिम राबवण्यात येत आहे. वीस राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतलं जाणार आहे.
Site Admin | November 6, 2024 2:05 PM | जल उत्सव | नीती आयोग