जल जीवन मिशन अंतर्गत, सरकारनं देशभरात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. नळाद्वारे पाणी मिळवण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात असून यामुळे विजेच्या बिलात बचत होईल असंही ते म्हणाले. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पडताळण्यासाठी देशातल्या ८ हजरांहून अधिक गावांचं सर्वेक्षण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | August 1, 2024 5:02 PM | clean water availability | Jal Jeevan Mission scheme
जल जीवन मिशनअंतर्गत सरकारनं देशात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या – मंत्री सी. आर. पाटील
