डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात बैठकीत चर्चा – एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय  सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय सहकार्य तसंच क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात  या बैठकीत चर्चा झाली. भारत अमेरिका भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सुलिवान यांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांची डॉ जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमवरच्या पोस्टमध्ये प्रशंसा केली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीदेखील नवी दिल्लीत सुलिवान यांची भेट घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा