जगात कुठेही भू-राजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कतारमधे दोहा फोरम २०२४ या चर्चासत्रात संघर्ष समेटाचं नवीन युग या विषयावर ते बोलत होते. भूमध्य सागरी प्रदेशात भारतीय वंशाचे सुमारे ५० हजार लोक राहतात, तर आखाती देशांमधे ही संख्या एक कोटीच्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय संघर्षात भारताची भूमिका पारंपरिक मध्यस्थ म्हणून सीमित नाही तर संघर्षग्रस्त देशात संवादसुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे असं ते रशिया युक्रेन संघर्षाच्या संदर्भात म्हणाले.
Site Admin | December 7, 2024 8:06 PM | Minister S. Jaishankar