लोकशाहीला पश्चिमी देशांचं वैशिष्ट्य मानत असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टिका केली आहे. ते काल म्युनिच सुरक्षा परिषदेत एका परिसंवादात बोलत होते. स्वतःच्या देशात लोकशाही तत्वांवर निष्ठा ठेवताना ग्लोबल साऊथ मध्ये मात्र पाश्चिमात्य देश बिगर लोकशाही विचारांना समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ राहिल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
Site Admin | February 15, 2025 7:28 PM | Foreign Minister S. Jaishankar
भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ-जयशंकर
