२ हजार १३ सालापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर ७ लाखाचं बक्षिस जाहीर केलं होतं. या माओवाद्यानं जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष, नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केलं आहे.
Site Admin | June 21, 2024 8:17 PM | नक्षलवादी | माओवादी