विकसित भारतासाठी नव्या संधींचा उपयोग करत देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ व्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते. देशात प्रचंड क्षमता असून पायाभूत सुविधा, दळणवळण, इंटरनेट सुविधा, तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करुन आपण पुढे जात असल्याचं ते म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पी.एम.उषा मेरु योजने अंतर्गत मंजूर चार इमारतींचं दृकश्राव्य पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यापीठाला १०० कोटीं रूपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
Site Admin | February 22, 2025 7:51 PM | Jagdeep Dhankhad | maharashtra daura
देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
