ओडिशामध्ये पुरी इथल्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरातल्या रत्नभांडाराचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले.राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार रत्नभांडार खुलं करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या संपूर्ण प्रक्रियेचं ध्वनीचित्रमुद्रण करण्यात येत आहे.या प्रक्रियेत मोजदाद केलेल्या दागिन्यांच्या पेट्या ठेवण्यासाठी कडक सुरक्षेसह तात्पुरता विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.
बाराव्या शतकातल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारात हिरे,सोनं आणि मौल्यवान रत्नांचे दुर्मिळ दागिने आहेत.या सर्वांची तपशीलवार नोंदणी करण्यात येणार आहे. याआधी १९८५ मध्ये हे रत्नभांडार उघडण्यात आलं होतं.तर इथल्या मौल्यवान जडजवाहिरांची गणना १९७८ मध्ये करण्यात आली होती.