ओडिशात,भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आज संध्याकाळी पुरी शहरात सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ रथ ज्या रस्त्यावरून ओढला जाणार आहे तिथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील सहभागी झाल्या आहेत. या रथयात्रेसाठी जगभरातले भाविक आले आहेत.
त्याआधी पहंडी विधी झाल्यानंतर पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा या तिन्ही भावंड देवतांचं पूजन केलं. या उत्सवासाठी राज्य सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी सर्व देशवासियांना जगन्नाथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.