भाजपाच्या नेतृत्त्वाखालच्या केंद्र सरकारने केलेली विकासकामं आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामुळे लवकरच भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज मुंबईत व्यक्त केला. विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांची त्यांनी आज भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या विविध योजनांमुळं देशाची आर्थिक घडी बसायला तसंच नागरिकांचं जीवनमान सुधारण्याला मदत झाली. भारताची आर्थिक प्रगतीही होत असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही घेतल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
Site Admin | November 13, 2024 7:06 PM | JP Nadda
प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामुळे भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल – जे. पी. नड्डा
