जम्मू कश्मिरमधे उधमपूर जिल्ह्यात, आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक शहीद झाला. रामनगर तालुक्यातल्या चील भागात हे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. गोळ्यांच्या ३० ते ४० फैरी त्यांनी या पथकावर झाडल्या. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी या परिसराला वेढा घातला असून, शोधमोहिम सुरु आहे.
Site Admin | August 19, 2024 8:08 PM | #जम्मू कश्मिर
जम्मू कश्मिरमधे दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक शहीद
