जागतिक महिला दिनानिमित्त इटली सरकारनं आज एका विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. या विधेयकानुसार देशात पहिल्यांदाच स्त्रीहत्येची कायदेशीर व्याख्या करत, या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे. इटलीतील महिलांवरील वाढता हिंसाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं हा कायदा केला जाणार आहे.
दरम्यान, आज महिला दिनानिमित्त तुर्कीए शहरात हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून महिलांवरील हिंसाचाराचा निषेध केला.