इटली मधल्या तुरिन इथं सुरु असलेल्या १२ व्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकं पटकावत भारतानं उत्साहवर्धक सुरुवात केली आहे.
स्नो बोर्डिंग क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत समीर यादव आणि भारती यांनी सुवर्ण पदकं तर हेमचंद आणि हर्षिता ठाकूर यांनी रजत पदकं पटकावली. या स्पर्धांमध्ये भारताचे ३० क्रीडापटु सहभागी झाले आहेत.
१०२ देशांमधल्या सुमारे पंधराशे खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धांमध्ये ८ विविध क्रीडाप्रकार समाविष्ट असणार आहेत.