इस्रोच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग काल यशस्वी झालं. या मोहिमेअंतर्गंत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या दोन उपग्रहांना इस्रोनं यशस्वीरित्या जोडलं. इस्रोच्या या यशामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे.
अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. चंद्रयान 4 आणि भारतीय अंतराळ स्थानक उभारणीसारख्या भविष्यातील अनेक मोहिमांसाठी याचा इस्रोला मोठा उपयोग होणार आहे. इस्रोच्या या यशाबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणि पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.