डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 13, 2025 11:03 AM | ISTRO | satellites

printer

इस्त्रोने स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर आणण्यात मिळवले यश

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर अर्थात 3 मीटर अंतरावर आणण्यात यश मिळवलं आहे. या उपग्रहावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्र पाठवण्यास सुरुवात झाल्याची माहिती इस्त्रोनं समाजमाध्यमावरील संदेशात देण्यात आली आहे. डॉकिंग प्रक्रिया या उपग्रहाने पाठवलेल्या डाटाचं विश्लेषण केल्यानंतरच केली जाईल. असंही इस्त्रोनं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेसाठी इस्रोने विकसित केलेले सर्व सेन्सर डॉकिंग प्रयोग करण्यापूर्वी पूर्णपणे कॅलिब्रेट आणि चाचणी करणे आवश्यक आहे. डॉकिंगनंतर, दोन्ही उपग्रह एकाच अंतराळयानाच्या स्वरूपात नियंत्रित केले जातील. इस्रोने विकसित केलेली स्वदेशी भारतीय डॉकिंग प्रणाली यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा