विश्वविजेता रुद्रांक्ष पाटील यानं ब्युनोस आयर्स इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं या स्पर्धेतील हे दुसरं सुवर्ण पदक असून या स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत ४ पदकं जमा झाली आहेत. महाराष्ट्राच्या रुद्रांशने अंतिम फेरीत २५२ पूर्णांक ९ गुणांचा वेध घेतला. विश्वचषक स्पर्धेतील हे त्यांचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
Site Admin | April 7, 2025 1:49 PM | ISSF World Cup
ISSF World Cup : १० मीटर एयर रायफलमध्ये भारताला सुवर्णपदक
