आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं भारताला पुढल्या वर्षीच्या जुनिअर वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या स्पर्धांमध्ये रायफल, पिस्तूल तसंच शॉटगन प्रकारच्या नेमबाजी स्पर्धांचा समावेश असणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या स्पर्धांचं यजमान पद भूषवण्याची संधी मिळणार असल्यानं भारतातल्या राष्ट्रीय रायफल संघटनेचा दबदबा वाढला आहे.
दरम्यान नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करण्याची भारताची ही अलीकडच्या काळातली तिसरी वेळ असणार आहे. यापूर्वी २०२३ दरम्यान भारतानं भोपाळमध्ये सिनिअर वर्ल्डकप आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सीजन एंडिंग वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केल्या होत्या.