अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी होत आहेत. या पथकाचं नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेती मनु भाकर करणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होणार आहे. या स्पर्धेत एअर रायफल, एअर पिस्तुल आणि शॉटगन प्रकार असून त्या ४५ देशांमधले ४०० हून अधिक नेमबाज सहभागी होत आहेत.
भारताच्या संघात मनु भाकरसह सौरभ चौधरी, अनिश भानवाला, विजयवीर सिद्धु, ईशा सिंग, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, सिफ्त कौर समरा, अर्जुन बबुता, पृथ्वीराज तोंडाईमन, अनंतजीत सिंग नरुका आणि रायझा धिल्लाँ हे प्रमुख खेळाडू आहेत.