डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इस्रोचा स्पॅडेक्स डॉकिंग प्रयोग आता 9 जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचा म्हणजे अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी नियोजित असणारा हा प्रयोग आता दोन दिवसांनी म्हणजे 9 तारखेला होणार आहे. इस्रोनं समाजमाध्यमावरून ही माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग प्रक्रियेला ग्राउंड सिम्युलेशनद्वारे आणखी प्रमाणीकरण आवश्यक आहे. या कारणामुळे डॉकिंगचा प्रयोग आता आता 9 जानेवारीला करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा