डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 8, 2024 10:15 AM

printer

इस्रोच्या चंद्रयान 3 संघाला दिला जाणार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

इस्रोच्या चंद्रयान 3 संघाला अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे. केंद्र सरकारनं 33 व्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. हे पुरस्कार विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात.

 

भारतीय विज्ञान संस्थेचे माजी सचिव प्रोफेसर जी. पद्मनाभन यांना जैविक विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विज्ञान रत्न पुरस्कार दिल जाणार असून विज्ञान श्री पुरस्कारासाठी आनंदरामकृष्णन सी, उमेश वार्ष्णेय, भीम सिंह, आदिमूर्ति आदि, सैयद वाज अहमद नकवी, संजय बिहारी आणि राहुल मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे.

 

विज्ञान युवा पुरस्कारांसाठी डॉ. बप्पी पॉल, डॉ. अभिलाष, राधा कृष्णन महालक्ष्मी, पूरबी सैकिया, दिगेंद्रनाथ स्वैन, प्रभु राजगोपाल आणि प्रशांत कुमार यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कारार्थिना 23 ऑगस्ट ला राष्ट्रीय अंतराळ दिवसाच औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा