डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इस्रोने स्पेडेक्स उपक्रमांतर्गत उपग्रह जोडणी यशस्वी केली

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेंकापासून तीन मीटर अंतरापर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया केली जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे.

 

डॉकिंगनंतर, दोन्ही उपग्रह एकाच अंतराळयानाच्या स्वरूपात नियंत्रित केले जातील. डॉकिंग यशस्वी झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात वीज हस्तांतरित केली जाईल. यानंतर, दोन्ही उपग्रह स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी अनडॉक केले जातील. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा