डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इस्रोची शतकपूर्ती, NVS-02 उपग्रहाचं यश्ववी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज सकाळी सहा वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही एफ-फिफ्टीन या शंभराव्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करत, अग्नीबाण प्रक्षेपणाची ऐतिहासिक शतकपूर्ती केली. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या अग्निबाणानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप आज बिटींग द रिट्रिट कार्यक्रमानं नवी दिल्लीतील विजय चौक इथं होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री या प्रसंगी उपस्थित राहतील. सेनादल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील बँड या समारंभात एकंदर 30 विविध प्रकारचं सादरीकरण करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा