या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
तसंच मानवी मोहिमेतील अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी गॅमा किरणांचं प्रमाण, अतिनील किरणोत्सर्गाचं प्रमाण आणि कॉस्मिक किरणोत्सर्ग तपासण्यासाठी आधुनिक सेंसर्स बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले. तामिळनाडूतल्या कुलसेकरपट्टिनम इथं अंतराळ केंद्र उभारण्याचं काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केलं जाण्याची त्यांनी ग्वाही दिली.