निसार अर्थात नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार या अभियानाच्या माध्यमातून जर अंतराळविषयक मोहिमांच्या कामाचा आणि खर्चाचा वाटा विभागला तर खर्चाचं प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत पाचपटीनं कमी होईल, असं प्रतिपादन इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काल केलं. अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित इंडिया टुमॉरो अनलॉकिंग इंडस्ट्री, इनोव्हेशन, टॅलेंट या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते.
निसार अभियानातून नासा आणि इस्रो या संस्था संपूर्ण जगाचा नकाशा तयार करतील. या नकाशातून पृथ्वीच्या परिसंस्थेतले बदल, पृथ्वीवरच्या बर्फाचं वस्तुमान, वनस्पतींची घनता, समुद्र पातळीतली वाढ, भूजल आणि नैसर्गिक धोके समजून घेण्यासाठी माहितीची नोंद करतील, असंही सोमनाथ यावेळी म्हणाले.