भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्त्रोचा अग्निबाण, 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. ही कामगिरी करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल. केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच आत्तापर्यंत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवले आहे.
ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रा आघाडी घेईल.