इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या सोमवारी स्पेडेक्स म्हणजेच अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अंतराळात दोन यानांचं विलीनीकरण होणार असल्याने इसरोचा हा प्रयोग ऐतिहासिक ठरणार असल्याचं ते म्हणाले. याद्वारे अंतराळात यानांचं विलीनीकरण करण्यात प्रभुत्व असणाऱ्या देशांच्या यादीत भारतही आपल्या नावाची नोंद करणार असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
Site Admin | December 28, 2024 7:59 PM | ISRO