डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे. 

 

दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. दरम्यान, लेबननच्या मेका खोऱ्यात हल्ला करण्यासाठी आपली विमानं सज्ज होत असल्याचं इस्रायलच्या लष्करी प्रवकत्यानं सांगितलं. 

 

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातला तणाव वाढत असून स्थिती दिवसोंदिवस बिघडत चालली आहे, ही अत्यंत चितेंची बाब असल्याच रशियानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा