इस्रायली सैन्याने काल लेबनॉनवर हल्ला करून चामा गावातली एक मोक्याची जागा ताब्यात घेतली. ही जागा सीमेपासून अंदाजे पाच किलोमीटर आत आहे. लेबनॉनने इस्रायली सैन्यावर शिमॉन प्रेषिताचं मंदिर आणि चामा गावातल्या अनेक घरांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बैरुतच्या दक्षिणेकडच्या उपनगरांर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात सहा जण ठार झाल्याची माहिती लेबनॉनच्या माध्यमांनी दिली आहे. लेबनॉनच्या सीमेजवळ असणाऱ्या इस्रायली नागरिकांना वाचवण्यासाठी हा हल्ला केल्याचं इस्रायली सूत्रांचं म्हणणं आहे.
Site Admin | November 17, 2024 2:43 PM
इस्रायली सैन्याने लेबनॉनवर हल्ला करून चामा गावातली एक मोक्याची जागा ताब्यात घेतली
