डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गाझामधल्या शेवटच्या कार्यरत रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला

गाझामधलं शेवटचं पूर्णपणे कार्यरत रुग्णालय अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयाचा काही भाग इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे.  या रुग्णालयात हमासचे कमांड आणि कंट्रोल केंद्र असल्यामुळे या रुग्णालयावर हल्ला केल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धबंदी कराराचा पहिला सहा आठवड्यांचा टप्पा या वर्षी १ मार्च रोजी संपला. युद्धबंदीवरील चर्चेचा दुसरा टप्पा रखडला आहे. १८ मार्चपासून इस्रायली सैन्यानं गाझावर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा