इस्रायलनं तार्तुसजवळच्या सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर हवाई हल्ले केले आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसल्याचं सीरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिरियन सिव्हिल डिफेन्सची पथकं तैनात करण्यात आली आहेत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण सीरियाचं लष्करीकरण करण्याचं आवाहन केलं आहे, तर सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शारा यांनी नवीन सरकारला इस्रायलशी संघर्ष नको असल्याचं म्हटलं आहे.
Site Admin | March 4, 2025 1:52 PM | Israel | Syria
सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर इस्रायलचे हवाई हल्ले
