इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी आज फेटाळला. अनेक पॅलिस्टिनी कैद्यांच्या बदल्यात चार इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची मागणी सिसी यांनी अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमादजिद यांच्या सोबत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली होती.
Site Admin | October 28, 2024 8:03 PM | Israel