हिजबुल्लाहशी युद्धविराम करारामध्ये निर्धारित केलेल्या ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतर देखील इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये राहील, असं इस्रायली सरकारनं म्हटलं आहे. करारानुसार लितानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून हिजबुल्लाहची शस्त्रं आणि सैन्य काढून टाकणं आवश्यक होतं तरीही अद्याप त्यांच्या अटी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे इस्रायलनं हा निर्णय घेतल्याचं इस्रायली प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. दोन्हीकडच्या सैन्यानं उद्याच्या २६ जानेवारीपर्यंत दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्याचं मान्य केलं होतं परंतु लेबनीज सैन्य अद्याप या प्रदेशात तैनात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, इस्रायली सैन्य येत्या रविवारी लेबनॉनमध्ये राहीलं तर ते कराराचं उल्लंघन मानलं जाईल, असा इशारा हिजबुल्लाहनं गुरुवारी दिला होता. इस्रायली सैन्यानं ऑक्टोबर, २०२३ मध्ये दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला होता. तर त्याचा सामना करण्यासाठी हमासनं हिजबुल्लाह बरोबर इस्राईलच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला केला होता.