इस्रायली सैन्य गाझामधल्या लष्करी कारवाईचा विस्तार करून या प्रदेशाचा मोठा भाग ताब्यात घेईल असं इस्रायलचे संरक्षण सचिव इस्रायल कात्झ यांनी म्हटलं आहे. या भागातल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचा खात्मा करणं हा या विस्तारित लष्करी कारवाईचा उद्देश असल्याचं कात्झ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
लष्करानं ताब्यात घेतलेला भाग इस्रायली सुरक्षा क्षेत्रात समाविष्ट केला जाईल. यासाठी मोठया संख्येनं पॅलेस्टाईनी लोकांचं स्थलांतर करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. हमासचा खात्मा करून इस्रायली ओलिसांची सुटका करावी, असं आवाहन करून युद्ध संपवण्याचा मार्ग असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.