गाझा पट्टी ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर विधानं केल्यानंतर गाझातल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलनं तयारी सुरु केली आहे. एकदा गाझातून बाहेर पडल्यानंतर इस्राएल पुन्हा परत येऊ देणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे पॅलेस्टिनींनी मात्र ट्रंप यांचा प्रस्ताव नाकारला आहे. गाझाचा ताबा घेऊन तिथल्या पॅलेस्टिनींना इतरत्र हलवून पूर्ण भूमीचा विकास करण्याचा प्रस्ताव ट्रंप यांनी जाहीर केला आहे. मात्र इजिप्त आणि इतर पश्चिम आशियाई देशांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. असं घडलं तर इस्राएल बरोबरचा शांतता करार संपुष्टात येईल असा इशारा इजिप्त आणि सौदी अरेबियानं दिला आहे.
Site Admin | February 7, 2025 8:19 PM | Israel
गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलची तयारी सुरु
