मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. सेन्सेक्स १ हजार ७६९ अंकांनी घसरुन ८२ हजार ४९७ अंकांवर बंद झाला निफ्टी ५४६ अंकांनी कोसळून २५ हजार २५० अंकांवर स्थिरावला. सकाळपासून सुरू झालेली घसरण व्यवहारसंपेपर्यंत वाढतच गेली. यामुळं मुंबई शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची मालमत्ता १० लाख कोटी रुपयांनी कमी झाली. सर्व प्रकारच्या कंपन्यांचे समभागांना या घसरणीचा फटका बसला. फ्युचर आणि ऑप्शन्स व्यवहारांसाठी सेबीनं आणलेल्या नव्या दिशानिर्देशांमुळंही बाजारात घसरण झाली.
Site Admin | October 3, 2024 8:05 PM | #nifty50 #NiftyBank #sensex
मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका
