इस्रायलनं गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर हमासने प्रथमच प्रत्युत्तरादाखल तेल अविववर रॉकेट हल्ले केले आहेत. त्यापैकी एक रॉकेट निकामी करण्यात आलं असून इतर दोन रॉकेट निर्जन क्षेत्रात पडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं सांगितलं.
दरम्यान, गाझामध्ये हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, इस्रायल मध्यरात्रीपासून करत असलेल्या हवाई हल्ल्यात किमान ८५ जणांचा मृत्यू झाला असून मंगळवार पासून आतपर्यंत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १३३ जण जखमी झाले आहेत. हमासने अजूनही ५९ जणांना ओलिस ठेवले असून त्यापैकी २४ जण जिवंत असल्याचा दावा इस्रायल सरकारने केला आहे.